जावेदजी आपलं वय, स्थान, बिरुदं या कशाचाही अडसर येऊ न देता, ते आपलं म्हणणं मांडत राहातात. उलट हिरिरीनं त्यात उतरून आपला मुद्दा मांडतात...
आज बहुसंख्य ज्येष्ठ व्यक्ती शक्यतो ‘पोलिटिकली करेक्ट’ ठरणारंच बोलताना दिसतात. व्यक्ती जितकी सांस्कृतिक, सामाजिक स्तरावर प्रभावशाली, तितकी ती गुळगुळीत, मोघम बोलणार हे गृहीत असतं. जावेदजी याला अपवाद. शक्यतो हसतमुखानं, खेळीमेळीच्या भाषेत; पण वेळेला शब्दांचे आसूड ओढायलाही कमी करत नाहीत. निर्णायक मत द्यायला, त्याची जबाबदारी घ्यायला, वेळ पडल्यास किंमत मोजायला ते तयार असतात.......